निराधारांना प्रमाणपत्रा सोबत उत्पन्न दाखला जोडण्याची अट

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

उत्पन्न दाखल काढण्यासाठी निरधारांच पायपीट बल्लारपूर : राज्य शासन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये अनुदान जमा केले जाते. यासाठी दरवर्षी तहसील कार्यालयात निराधारांना हयात प्रमाणपत्र द्यावे लागते. मात्र, शासनाने या योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला जोडण्याची जाचक अट घातली आहे. त्याकरिता भर उन्हाळ्यात निराधारांना उत्पन्न दाखला काढण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.येथील तलाठी कार्यालयात भर उन्हात दिव्याग, वूद्ध, व्यक्ती उत्पन्न दाखला काढण्यासाठी दिसत आहे. उन्हाचा पारा ४० चा वर आहे. अश्यातच त्यांना उत्पन्न दाखल्यासाठी उन्हात उभे रहावे लागत आहे.तहसील प्रशासन ने योजना मध्ये लाभार्थीना तहसील कार्यालय येथे एक खिडकी सुरू करून त्यांना उत्पन्न दाखला देण्यात यावे.

CLICK TO SHARE