एड.सुनिताताई पाटिल यांची आम आदमी पक्षात घरवापसी

चुनाव

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपुर बल्लारपूर:बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024- काहि महिन्यांपुर्वी आम आदमी पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या माजी महिला अध्यक्षा एड. सुनिताताई पाटिल यांची आज दिनांक:- २४ एप्रिल २०२४ रोजी आम आदमी पक्षात घरवापसी झाली आहे. आम आदमी पक्ष सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतरही आम आदमी पक्षाची विचारसरणी व केजरीवाल साहेबांच्या विकासकार्यांवर त्यांची निष्ठा कमी होऊ शकली नाही. त्यामुळेच जिल्हा संघठनमंत्री श्री. भिवराज सोनी यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरेकर, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज भाई शेख, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्या, श्री सुनील जी भोयर, श्री रामदास चौधरी, बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, बल्लारपूर युवा अध्यक्ष सागर कांबळे, यांच्या प्रमूख उपस्थितीत त्यांनी आम आदमी पक्षात पुन्हा घरवापसी केली. यासोबतच केजरीवाल यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून जनसामान्यांचा हक्कासाठी व पक्ष वाढिसाठी जोमाने कार्य करणार असे देखील एड. सुनिता पाटिल यांनी म्हटले.या वेळी ऍड. सुनीताताई पाटील सह पूजा खोबरे, स्वाती डोंगरे, सीमा पेंदाम, शुभांगी बावणे, मनीषा बावणे, ज्योती संगेवार, काजल उचके, देवकाबाई इंगळे, साधना पाटील, सुहास रामटेके, संतोशी यादव, ज्योती यादव, प्रशांत रामटेके, नंदकिशोर स्वान, सुनील चौधरी, निधी चौधरी, निलेश दाडे, अदनान शेख व असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ता यांनी पक्षप्रवेश केला.

CLICK TO SHARE