यशदा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सातेफळ येथे मानवी जीवनात सापाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
महाराष्ट्रासह विदर्भ व देशात अनेक साप विविध सुंदर रंगासह आकर्षक डिझाईन चे साप असून त्यात मानवाच्या जवळपास आढळणारे फक्त मण्यार,घोणस,नाग व फुरसे हेच विषारी सांप आढळतात मानवांचे या चारही विषारी सापाचा दंश होवून अनेक मृत्युमुखी पडतात तर विषारी साप समजून बिनविषारी सापांची सर्रासपणे हत्या केली जाते ज्याची नोंद वनविभाग घेतांना दिसत नाही कारण सरकारदरबारी सांप आणि सर्पदंश पिडीत व्यक्ती दोघेही बेदखल आहे.त्यामुळे सापांचे व मानवी जीवन वाचविण्यासाठी सरकार निष्क्रिय आहे असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव व विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ येथील यशदा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मानवी जिवनात सापांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचावर प्राचार्य लकी खिलोसिया, राज्य पदाधिकारी प्रकाश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून गजेंद्र सुरकार यांनी माहिती देताना सापांची आकृती अनेक शिल्पावर,तसेच देव,देवतांच्या गळ्यात, मनगटावर, गळ्यात अलकांराच्या रूपात आजही दिसते तर नागपंचमीसह वर्षभर सापांची पुजा हिंदू धर्मिय करतात तर विज्ञान युगामध्ये चारही विषारी सापांच्या विषयापासून अनेक प्रकारच्या औषधी मानवी जीवन वाचविण्यासाठी केला जातो ज्यात विषारी सर्पदंशावर अत्यंत उपयोगी असलेले प्रतीसर्पविष हे नाग, मण्यार घोणस फुरसे यांच्या विषापासून तयार करण्यात आले आहे तर उंदीर,घूस व ईतर धान्याची नासाडी करणाऱ्या प्राण्यांना खावून साप धान्य वाचविण्यासोबतच त्यांच्या प्रजनन संख्यावाढिवर नियंत्रण ठेवते त्यामुळे सापांचे महत्त्व निसर्गात व मानवी जीवनात महत्वाचे आहे त्यामुळे साप वन्यजीव सुचित संरक्षित आहे त्याला ईतर जंगली प्राण्यांप्रमाणे वन्यजिव म्हणून सरकारने दखल घेतली मात्र सर्रासपणे सापांची हत्या केली जाते व कार्यवाही केली जात नाही साप मारणें हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरले असतांना एकही गन्हा दाखल होत नाही तर दुसरीकडे वन्यजीव सुचित संरक्षित करण्यात आलेल्या विषारी सापाने दंश केल्यास मृत्यू होतो किंवा फार मोठा उपचारासाठी खर्च येतो अनेकदा हात व पायांना व्यंगत्व येते मात्र मोबदला म्हणून कोणत्याही रूपातील आर्थिक मदत सरकार कडून मिळत नाही त्यामुळे साप व माणूस हे दोघेही सरकार दरबारी बेदखल आहे यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने व विदर्भ सर्प मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले व सांपांची माहिती, देणारे कॅलेंडर स्वरूपातील पोष्टर विद्यालयाला दर्शनी भागात लावण्यासाठी दिले तसेच विषारी बिनविषारी सापांची माहिती, ओळख करून देण्यात आली सोबतच विषारी सर्पदंशावर उपचार, प्रथमोपचार,विषांचे प्रकार,सापाविषयी असलेले गैरसमज समज, अंधश्रद्धा यावर शास्त्रीय माहिती देवून खंडन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कांबळे तर आभारप्रदर्शन प्राचार्य लकी खिलोसिया यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक, उपस्थित होते