संत भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात

धर्म

5 मे रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन वारकरी संप्रदायाची भगवी पताका फड़कावत श्री भोजाजी नामाचा होणार जयघोष

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील विदर्भाचे पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र आजनसरा येथे दरवर्शी प्रमाणे याही वर्षी संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला 28 एप्रिल पासून सुरुवात झाली असुन,5 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, पुण्यतिथी सप्ताहात वाणीभूषण सुप्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. सुरेश महाराज बाकडे यांच्या वाणीतून दररोज सकाळी 8 ते 11 व रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे, 28एप्रिल ला सकाळी 8वाजता रामाजी बापूरावजी पर्बत यांच्या हस्ते कलश स्थापना व वीणा सुरु करुन दैनंदिन कार्यक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे 5मे ला 9 ते 12 या वेळात सुरेश महाराज बाकडे यांचे गोपाल काल्याचे कीर्तणानंतर दुफारी 1 ते 5 वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानंतर रात्री 8 वाजता नंतर संत भोजाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक व दिंडी स्पर्धा होणार आहे,या निमित्ताने वर्धा नदीच्या तिरालगत असलेल्या श्री संत भोजाजी महाराजांच्या प्रती श्रद्धा असलेले असंख्य भाविक पुण्यतिथी सोहळयाला हजेरी लावनार असल्याने आजनसरा येथे भाविकांचा जनसागर उसळनार आहे,त्यामुळे पुरण पोळीचा स्वयंपाक घेऊन येणाऱ्या भाविकांनी 4 मे ते 6 मे पर्यंत मंदिर परिसरातील शेड मध्ये जागा उपलब्ध नसणार आहे, दरवर्षी आजनसरा या संत नगरीत दिंडी सोहळा पाहण्यासाठी दुर दुरून भाविक हजेरी लावत असतात, या वर्षी पुण्यतिथी व दिंडी सोहळा रविवार 5 मे रोजी होणार आहे, दिंडी सोहळ्याचे विशेष म्हणजे दिंडी वर्धा नादिच्या तिरावरून परिक्रमा करीत असतांना भाविकांना आपण पंढरपुरलाच असल्याचा भास होत असतो,श्रीमद्भभागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहांत ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन आणि प्रवचणाने परिसर मंत्र मुग्ध होतो, गावात घरोघरी पाहुने मंडळी प्रवचनकार कीर्तनकार व वारकरी संमप्रदायातील लोकांचा वास असतो, त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा” ह्या ओळी सहज ओठांवर येतात, हा सोहळा आजनसरा वासीयांसाठी दिवाळी पेक्षाही मोठा उत्सव गावकारी मानतात आपसातील मतभेद विसरुन, वाट्याला येईल ती सेवा समस्त गावकऱ्यांतर्फे या पुण्यतिथी महोत्सवात केली जाते, त्यामुळे या उत्सवाचा नावलौकिक संपूर्ण विदर्भात पसरला आहे,हे सर्व काही घडवुण आनतात ते संत आपण केवळ नाममात्र अहोत असे येथील गवकारी भावूक होऊन सांगतातगावातील प्रत्येक बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तिपर्यंतचा सहभाग हे येथिल वैशिष्ट्य मानावे लगेल, भगव्या पताका भजनी दिंड्या भोजाजी नामाचा गजर करीत वारकरी सम्प्रदायाची पताका तेवत ठेऊन श्री भोजाजी महाराजांच्या जयघोषात तल्लीन होऊन जातात, वर्षभर येथे चालत असलेल्या धार्मिक कार्यक्रमात राम नमवी आषाढी एकादशी कार्तिक यात्रा, दैनंदिन हरिपाठ भजन कीर्तन तसेच अखंड निनादत पंधरवादी एकादशिला महाराजांच्या पालखीची नगर परिक्रमा करण्यात येते, भोजाजी महाराजांच्या प्रती श्रद्धा असलेले विदर्भातील असंख्य भाविक भक्त या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहनार असुन, भक्तिमय वातावरनात भक्तीरसाचा आनंद मिळनार असल्याने, आजनसरा नगरीत भाविकांची गर्दी उसळनार हे मात्र तेवडेच खरे, आजनसरा हे गाव खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आले ते संतांच्या पाऊल खुणांनी यास्थळी संत भोजाजी महाराज व महान तपस्वी संत सोनामाई हे दोन संत होऊन गेलेत या संत महातम्यांच्या पावन स्पर्शाने नावारूपास आलेल्या आजनसरा संत नगरीत भव्य दिव्य संत भोजाजी महाराज व सोनामाई यांचे मंदिर असुन विदर्भाची दूसरी पंढरी म्हणून या गावाची ओळख आहे, “पवित्र ते कुळ पावन तो देश” जिथे हरिचे दास जन्म घेती” या उक्ति प्रमाने संत भोजाजी महाराजांच्या भक्ति भावाने पवित्र झालेल्या या आजनसरा नगरीत भाविक भक्त व देवस्थान कमेटिकडून पुण्यतिथी महोत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात येत असतो.

CLICK TO SHARE