बल्लारपूर शहरात मोफत खेळ शिबिराचे आयोजन

खेल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूरतर्फे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात २ ते १९ मे दरम्यान खेळ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात व्हॉलीबॉल, फुटबॉल, डिस्कस थ्रो, योगा, झुंबा डान्स, कबड्डी, धावणे, बॅडमिंटन, खो-खो व इतर खेळांची प्राथमिक माहिती अनुभवी प्रशिक्षकांकडून मोफत दिली जाणार आहे. शिबिराची वेळ सकाळी ६ ते ८ आणि संध्याकाळी ६ ते ८ अशी असेल. शिबिरात सहभागी होण्यासाठी १० वर्ष वयाची असणे बंधनकारक आहे. या शिबिरातून मागच्या वर्षी ३ खेळाडू नैतिक कुकुडकर, श्लोक तिवारी व आरूष चव्हाण राज्यस्तरावर खेळले आहेत.या मोफत उन्हाळी शिबिरात खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख कोच प्रमोद आवते, काशीनाथ सिंह, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रज्वल यांनी केले आहे.

CLICK TO SHARE