अंगाला हळद लागण्यापूर्वीच नववधुने घेतला जगचा निरोप

अन्य

ज्या दिवशी होती हळद त्यादिवशी रचावे लागले बापाला सरण

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:जो आवडत होता त्याच्याशी तिचे लग्न जुळले.भावी आयुष्याचे स्वप्न रंगवत होती.एक दिवसा नंतर तिचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र नियतिला काही वेगळेच मान्य होते.२८ एप्रिल रविवारला तिची हळद होती परंतु निर्दयी काळाने तिच्या बापावर तिचे सरण रचण्याची वेळ आणली निशब्द होऊन वडील व भावी पती तिच्या शवाकडे एकटक पाहतच होते.हे पाहुण गावकऱ्यांचे सुद्धा डोळे पाणावले.ही दुदैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली.तिच्या उपचाराच्या खर्चासाठी गावकऱ्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली होती.परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिचा उपचारादरम्यान नागपूर येथील एम्स रुग्णालयात २७ एप्रिल  शनिवारला सायंकाळी ८ वाजता मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली महादेव गेडाम (२४) असे मृत पावलेल्या भावीवधूचे नाव आहे. वैशालीचा विवाह तिला आवडत असलेल्या गावातीलच जय टेकाम या युवकासोबत २९ एप्रिल २०२४ ला विसापूर येथे होणार होता. आठ दिवसापूर्वी तिचे पोट खूप दुखत होते अचानक जास्त अस्वस्थता वाटत असल्याने तिला चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. चार दिवस तिच्यावर उपचार झाल्यावरही प्रकृतीत पाहिजे तशी  सुधारणा झाली नसल्याने डॉक्टरांनी तिला कावीळ सदृश आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचां सल्ला दिला. तिथे तिच्यावर चार दिवस उपचार चालला होता. परंतु प्रकृती आणखीनच खालवत होती २७ एप्रिल शनिवारला सायंकाळी तिची प्रकृती खूपच गंभीर झाली ही बाब गावकऱ्यांना माहीत झाल्यावर तिच्या उपचारासाठी सर्वांनी यथाशक्तीने आर्थिक मदत केली. परंतु त्याचा मदतीचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर शनिवारी सायंकाळी ८ वाजता उपचाराला दाद देणे तिने बंद केले. आणि तिची प्राणज्योत मावळली.  शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा आपण तिला वाचवू शकलो नाही या विवंचनेत तिचा वडील व भावी पती निशब्द होवून तिच्या कडे एकटक पाहत होते. ज्या दिवशी तिची हळद होती त्या दिवशी तिचे सरण रचण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे पाहून परिसरातील नागरिकांचे डोळे सुद्धा पाणावले.

CLICK TO SHARE