बल्लारपूर येथे अवैध मार्गाने होणारा लाखोचा दारूचा साठा जप्त

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : येथे लाखोचा दारूचा साठा अवैध मार्गाने वाहतूक करताना बल्लारपूर पोलिसांनी काल २७ एप्रिल रोजी जप्त केले . बल्लारपूर पोलिस २७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता प्रोव्हिशन रेड कामी पेट्रोलीग करित असताना झडती वीसापुर रोड वरील किल्ला वार्ड बल्लारपूर येथे टाटा एस गाडी क्रं एम एच ३४ ए बि ५८०१ची झडती घेतली असता त्यात ४८ दारुच्या पेट्या आढळून आल्या.ज्याची किंमत ३ लाख सत्तर हजार रुपये तसेच टाटा एस गाडी किंमत अंदाजे चार लाख रुपये मुद्देमाल मिळुन आलें.आरोपी राकेश अरुण मामीडवार (३७) रा.नेताजी चौक,बाबुपेठ चंद्रपूर यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आले.सदर मिळालेल्या माहितीनुसार दारू खुटाळा येथुन बल्लारपूर येथील टिकले वाइन शॉप येथे आपल्या जात होते.या अगोदर सुध्दा आळ मार्गाने दारू ची वाहतूक करताना विसापुर येथे जप्त करण्यात आले होते.  सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, अमितकुमार पांडेय, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, विक्की लोखंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, पो हवा संतोष दांडेवार, रणविजय ठाकूर, आनंद परचाके, सुनील कामटकर, पोशी शेखर  माथनकर, मिलिंद आत्राम, श्रीनिवास वाभिटकर ई. स्टॉफ ने केले.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंयु, बी. दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडचार, पोहवा, संतोष दंडेवार, सफौ. गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, आंनद परचाके, सुनिल कामटकर, पो.अं. शेखर माधनकर, श्रिनिवास वाभिटकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.

CLICK TO SHARE