आजपासून तिन दिवस बल्लारपूरचा पाणी पुरवठा बंद

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :अगोदरच बल्लारपूर शहरातील मोठ्या लोकसंख्येला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आता ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा २८ ते ३० एप्रिल दरम्यान बंद राहणार असल्याने नागरिकांना आणखी अडचिणाना सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक नगरपरिषद क्षेत्र असलेल्या या शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत वर्धा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वर्धा नदीजवळील जुन्या पाइप लाइनला मोठी पाइप लाइन जोडण्याचे काम जीवन प्राधिकरण करणार आहे. या कालावधीत २८ ते ३० एप्रिल दरम्यान शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CLICK TO SHARE