आजनसरा मंदिरात अश्वीनने १३ तासांच्या अथक परिश्रमातून रेखाटली संत भोजाजी महाराजांची रांगोळी

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

आजनसरा येथिल विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या संत भोजाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पुण्यतिथी निमित्ताने काल सोमवारी २९ एप्रिलला सकाळी ६ वाजेपासून गावातील अश्वीन नावाच्या तरुणाने १३ तासाच्या अथक परिश्रमातून संत भोजाजी महाराज यांच्या मुर्ती समोर संत भोजाजी महाराजांची सुरेख अशी रांगोळी रेखाटली असून या रांगोळीने येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अश्विनचे सर्वत्र कौतुक केल्या जातं आहे

CLICK TO SHARE