ढगे लेआऊट येथील कूपनलिका नादुरुस्त,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर
उन्हाळा वाढत असुन पुढील काही दिवसांत ४० ते ५० अंश सेल्सिअस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे . यातच सध्या गावामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवन प्राधिकरण योजनेकडून गावातील एका भागात पाणी सोडले जाते व तीन भागांत अलमडोह येथील यशोदा नदीवरून पाणीपुरवठा केल्या जातो. मात्र, सध्या भरउन्हाळ्यात कृत्रिम जलसंकट ओढावले असून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.गावामध्ये पाणीपुरवठा करणारी प्राधिकरणाची पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळेगावात ग्रामपंचायतीद्वारा दवंडी फिरविण्यात आली आहे. पाणीपुरवठ करणारी पाइपलाइन फुटल्याने नळ येणार नसल्याचे सांगितले जात आहे पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने गावातील अनेक वॉर्डामध्ये तीन दिवसांआड नळाला पाणी येत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गावातील नागरिकांना नियमित पाणपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांतून जोन धरू लागली आहे. तसेच ढगे लेआऊट , भारतीय स्टेट बँक जवळ व इतरही काही कूपनलिका नादुरूस्त आहे त्यामुळे भर उन्हात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गावातील कूपनलिकेची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे . याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे .ग्रामपंचायतीने त्वरीत लक्ष देऊन कूपनलिका दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे . सरपंचासह ग्रामसेवकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे-