अखेर त्या नरभक्षक वाघाला वन विभागाने केले जेरबंद

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापासून धुमाकूळ घालत चार इसमाचा बळी घेवून दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक वाघ टी- ८६-एम ला जेरबंद करण्यात बल्लारशाह वन विभागाला अखेर सोमवार २९ एप्रिलला सायंकाळी ६-३० जेरबंद करण्यात यश आले. मागील पाच वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा वाघ परिसरात पकडण्याची ही पाहिलच घटना आहे. यामुळे बल्लारपूर शहर जंगलालगत परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निःश्वास सोडला.बल्लारशाह वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापासून बल्लारशाह- कारवा परिसरात वाघाने चार इसमाचा बळी घेणाऱ्या घटने पासून वन विभाग डोळ्यात तेल ओतून मागोवा घेत होता व त्याला जेरबंद करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू होती. वन कर्मचारी हे दररोज वनात दिवस रात्र गस्त घालत होते. अखेर २९ एप्रिला नियतक्षेत्र बल्लाशाह मधील वनखंड क्र. ४९४ मधील ट्रॅप कॅमेरामध्ये सदर वाघ दिसून आला.वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह यांनी तात्काळ अधिनिस्त सर्व कर्मचारी यांना सोबत घेऊन वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवत बल्लारशाह – करावा रोडचे वनात सेटअप लावण्यात लावला. त्यानंतर वाघ हा टी-८६- एम असल्याची खात्री करण्यात आली. त्याला सायंकाळी ६-३० वाजताचे सुमारास पशु वैद्यकीय अधिकारी वन्य जीव उपचार केंद्र चंद्रपूर डॉ. कुंदन पोडचलवार यांचे मार्गदर्शनात शूटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला गणद्वारे डॉट मारले. त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक व आदेशकुमार शेंडगे व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांचे नेतृत्व सर्व वन कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने डॉट मारल्यानंतर वाघाची शोध मोहीम राबवली त्यामध्ये सदर वाघ बेशुद्ध आढळला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची तपासणी करून त्यास पिंजऱ्यात बंद करून पुढील तपासणी करता वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे पाठविले. वाघ नर असून तो अंदाजे दहा वर्षाचा असल्याबाबत त्यांनी माहिती दिली.या मोहिमेच्या यशस्वी आयोजनात उपवनसंरक्षक अधिकारी मध्य चांदा विभाग स्वेता बोडड्डू यांच्या मार्गदर्शनात सहा वनसंरक्षक अधिकारी मध्य चांदा वनविभाग आदेशकुमार शेंडगे व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक बल्लारशाह के. एन. घुगलोत, ए.एस. पठाण (उमरी), व्ही.पी. रामटेके (करावा), वनसंरक्षक एस. एम. बोकडे, आर.एस. दुर्योधन, डी. बी. मेश्राम, टी.ओ. कमले, ए.बी. चौधरी, पी.एच. आनकाडे, एस. आर. देशमुख, बी.एम. वनकर, अतीशिग्र दल चंद्रपूर कर्मचारी पीआरटी पथक इटोली, उमरी पोतदार, उमरी तुकुम सातारा कोमटी, सातारा भोसले आणि रोजंदारी वनमजूर यांनी परीश्रम घेवून मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश प्राप्त झाले. बायोलॉजिस्ट नुरअली सय्यद, रोजंदारी संरक्षण मजूर यांनी दररोज ट्रॅप कॅमेरे चेक करणे व टी- ८६- एम नर वाघाला मागोवा घेण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आणि बल्लारशाह – कारवा जंगल परिसरात हिंस्र वन्य प्राण्यांचा वावर असल्याने नागरिकांनी वनात प्रवेश करू नये, असे आवाहन केले.

CLICK TO SHARE