शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
१ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसानिमित्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने फळ वाटप बल्लारपूर:- १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसानिमित्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा बल्लारपूर वतीने मंदिपदादा रोडे जिल्हाध्यक्ष मनसे यांचा मार्गदर्शना खाली सरकारी रुग्णालय बल्लारपूर येथील रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा बल्लारपूर तर्फे बल्लारपूर शहर अध्यक्ष मनसे उमेश कुंडले यांचा नेतृत्वाखाली बल्लारपूर सरकारी रुग्णालय इथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने विष्णु बुजोनो, जिल्हा उपाध्यक्ष गोपाल मोहुर्ले तालुका अध्यक्ष, अरुणाताई तोडसाम शहर अध्यक्ष महिला आघाडी, पंकज दोतपल्ली, मनीष दोतपल्ली, राहुल जैस्वाल, चेतन मंगाम, राहुल कामटवार, योगराज चौधर, योगेश हांडे, प्रवीण बावणे, राजेश कोणपत्तीवार, स्मिता आत्राम, वर्षा जोशी, पपीता भगत, रघुना आवळे सह शेकडो मनसे सैनिक उपस्थित होते.