विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षकांची भटकंती,पटसंख्या वाढविणे शिक्षकापुढे आव्हान

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

यशवंत प्राथमिक शाळेचा निकाल दिनांक ३ मे रोजी जाहिर होताच ४था वर्ग पास झालेला विद्यार्थी ५ व्या वर्गात प्रवेश घेणार याकरिता यशवंत हायस्कूल व इंदिरा गांधी हायस्कूल यांच्याकडून विद्यार्थी शोधमोहीम राबविली जात आहे.५ वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळा महाविद्यालयाचे महत्व पट ऊन देत प्रवेश घेण्यासाठी बाध्य करीत आहे. आपल्या शाळेतील वर्गाची पटसंख्या कायम राहावी याकरिता इंदिरा गांधी विद्यालयाच्या शिक्षकांनी यशवंत प्राथमिक शाळेच्या बाहेर ठाण मांडून विद्यार्थी शोधमोहीम सुरू आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांकडे जाऊन शिक्षण घेत असे परंतु जस जसा काळ बदलला तसे संदर्भ बदलले आणि इंग्रजी माध्यमातून पाल्याला शिक्षण देण्याकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळा ओस पडत आहेत.याचाच परिणाम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , यशवंत विद्यालय , इंदिरा गांधी विद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात भटकंती करीत असुन विद्यार्थ्याने आपल्याच शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून विविध प्रकारची प्रलोभने देत असल्याचे दिसून येते आहेत .गावात इंग्रजी माध्यमाची सेंट जॉन शाळा सूरू झाल्याने पालकांचा या शाळेत पाल्याला प्रवेश देण्याकडे कल आहे.त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी झाल्यास नोकरीवर गडांतर येऊ शकते या भीतीपोटी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी विद्यार्थ्यांची शोधमोहीम रबवितांना दिसत आहे.

CLICK TO SHARE