भारसिंगी ते कारंजा रोड वर भीषण अपघात,अपघातात दोघे जण जागीच ठार

क्राइम

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

नरखेड:(दि.03) जामगाव येथे कौटुंबिक परिवारात नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमला जात असताना जोलवाडी फाट्या जवळ रोड वर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रॅक(डंपर) क्र. MH 49 AT 9051 वर दुचाकी धडकली असून दोन जण जागीच ठार झाले आहेत फिर्यादी दीनदयाल लक्ष्मण मुरोडीया वय वर्ष ३७ यांच्या तक्रारी वरून जलालखेडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अपराध क्रमांक 221/24 कलम 304 (अ), 283 भादवी सहकलम 134, 122,177 भादवी ट्रक हा अद्यात खासगी कँपनीचा असून समोरील तपास सुरू आहे मृतःलखन यहुजी चिचोरीया रा.कारला व त्याचे इवाई नामे सुरेश अर्जुन पडोलीया रा.बढोना तह.काटोल हे दोघे कौटुंबिक कार्यक्रमात जात असताना जामगाव दि.03/05/2024 रात्री 7:00 ते 7:30 दरम्यान रोड साईड वर बंद अवस्थेत ट्रक(डंपर)उभा होता त्यात भारसिंगी कडून जामगाव कडे 1)लखन यहुजी चीचोरिया राह.कारला त्यांचे इवाई व 2) सुरेश अर्जुन पडोलिया राह. वाढोना तह.काटोल हे मोटार सायकल ( क्र.MH-31 BD 8189) ने जात असताना त्यांची दुचाकी ट्रक वर आदळली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून पुढील तपास जलालखेडा पोलिस करत आहे

CLICK TO SHARE