हिंगणघाट क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्र येथे उन्हाळी शिबिरांचे उद्घाटन

खेल

प्रतिनिधि :उमेश नेवारे हिंगणघाट

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा व तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आज दिनांक 7 मे 2024, रोज मंगळवारला सायंकाळी सहा वाजता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने करण्यात आले या उद्घाटन समारंभाला लिटिल एंजल्स स्कूल चे मुख्याध्यापक माननीय अजय फुलझेले सर यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी. एल खांडरे, क्रीडा मार्गदर्शक मुस्तफा बकस, रोहित राऊत, पालक, अजय बारसागडे नदीम शेख गोपी कोटेवार नजिर खान मोहसीन बावा व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी तालुका क्रीडा संयोजक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच माननीय मुख्याध्यापक फुलझेले सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये हिरारीने सहभागी होऊन हिंगणघाट तालुक्याची व जिल्ह्याचे आणि देशाचे नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या या उन्हाळी प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्तफा बक्स यांनी केले. पाहुण्यांचे आभार तालुका क्रीडा संयोजक बी. एल खांडरे यांनी मानले.

CLICK TO SHARE