आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना बेल मिळाल्या बद्दल बल्लारपूरमध्ये पक्षातर्फे जल्लोष साजरा

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद या केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याचे आरोप करून अटक करण्यात आले होते. परंतु आम आदमी पक्षाचे गड असलेल्या दिल्ली- पंजाब मध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी केजरीवाल यांची जमानत वर सुटका झाल्याने आप मध्ये देशभरात ऊर्जा संचारल्याचे दिसून येत आहे. अशीच ऊर्जा बल्लारपूर शहरातील आम आदमी पक्षाला देखील मिळाल्याचे दिसून आले.शहरातील बस स्थानक ते नगरपरिषद चौका पर्यंत पक्षातर्फे अतिषबाजीसोबत बॅन्ड बाजाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, सर्वाना मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.अत्यंत उत्साहात कार्यकर्ते व पदाधिकारी केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष देतांना दिसले आणि शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी केजरीवालांची जमानत म्हणजे भाजप च्या पतनाची सुरवात आहे.असे म्हटले.यावेळेस बल्लारपूर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE