तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन सदर ग्रामपंचायत कार्यालयात मागील काही दिवसापासून ऑनलाईन सेवा बंद झाली आहे. नागरीकांना व विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र असे अनेक प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयातून ऑनलाईन मिळतात परंतू ज्या कंपनीकडे ऑनलाईन सेवेचा काँट्राक होता त्यांनी तो बंद केल्यामुळे सदर काँट्राक हा दुसऱ्या कंपनीला दीला असुन त्या कंपनीने आतापावेतो स्वॉप्टवेअर बनवले नसल्याने ऑनलाईन प्रमाणपत्र घेण्याकरिता येथिल नागरीकांना व विध्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात येरझाऱ्या मारावे लागतात.तसेच ऑफलाईन प्रमाणपत्र दिले जाते परंतु ते ग्राह्य धरले जात नाही याचा विचार करून तातडीने ऑनलाईन सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.