वर्धा यशोदा नदी संगमावर थाटेश्र्वर मंदिराला जाणा-या गोंडी देवाची चिखलात तारेवरची कसरत

अन्य

भाविक भक्तासह मंदिर व्यवस्थापकांनी केली रस्ताची मागणी तरी लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष फक्त निवडणुकीत पोकळ आश्वासन.

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील श्री क्षेत्र थाटेश्वर शिवालय हे काशी पुराणात उल्लेखनीय थाटेक्ष्वर हेमाडपंथी मंदिर वर्धा यशोदा नदी संगमावर वसलेले आहे.दरवर्षी या नदी संगमावर वैशाख शु.विनायक चतुर्थी ते वैशाख शु.पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात गोंडी देव स्नान करण्यासाठी व शिवाचे दर्शनाला येतात.त्याप्रमाणे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा यात्रा महोत्सव सोहळा साजरा केला जातो.तसेच दर दिवसाला अनेक भाविक भक्तांची येजा असते. इतकेच नव्हे तर श्रावण महिन्यात अनेक भाविक आपला स्वयंपाक घेवून येतात.या तिर्थक्षेत्र थाटेश्वर येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भक्तांना ४ ते ५ किमी पायपीट करावी लागते.तसेच पावसाळ्यात तर या रस्त्याने जाताना आपला जिव मुठीत घेऊन जावे लागते.लोकप्रतिनीधी आणि प्रशासना कडे देवस्थानच्या वतीने वांरवार रस्ता निर्मीतीची मागणी केली. परंतु दुर्लक्ष करण्यात आले. थाटेश्वर तीर्थक्षेत्र वर्धा यशोदा नदी संगमावर असुन ऋषीमुनीची तपोभूमी सोबतच बारा मारुतीचा शिवा असल्याने या भूमीला लघुकाशी म्हणून संबोधले जाते प्रभू रामचंद्र जाताना शंकराला आलिंगन देण्यास निघाले असता संगमातून स्वयंभू पंचधारा निर्माण झाल्याची आख्यायिका आहे त्यामुळे या स्थळाला पंचधारा असे संबोधले जाते. यातच यावर्षी सुध्दा अवकाळी पावसाने थैमान घातल्याने या नदी संगमावर जाण्याकरता गोंडी देवांना मोठी तारे वरती कसरत करावी लागत आहे. गोंडी देवासह हजारो भावी भक्तांना चार ते पाच किलोमीटर अंतर हे चिखलातून पायपीट करावे लागते सोनेगाव ते थाटेश्वर तसेच टाकळी चौफुली ते थाटेश्वर त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून थाटेश्वर देवस्थानचे सचिव भास्कर कोसुरकर यांनी खासदार, आमदार, प्रशासनाकडे लावून धरली मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतो फक्त आणि फक्त निवडणुकीदरम्यान लोकप्रतिनिधीकडून खोटी आश्वासने भूल थापा दिल्या जात आहे.

CLICK TO SHARE