शहरातील वस्तीविभागाला जोडणारा एकमेव गोलपुलिया मार्गाचे निराकरण करण्याची मागणी भाजपा

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: शहरातील वस्ती विभागाला जोडणारा गोल पुलिया मार्ग रेल्वे चे चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येत आहे त्या करीता रेल्वे गोल पुलिया चे पुल वाढवण्याचे काम चालू आहे. रेल्वे प्रशासन ने काही दिवस गोल पुलिया चा मार्ग बंद करून धातुर -मातुर काम करुन अर्धवट काम करुन सोडुन दिले. थोड्या पावसातच गोल पुलिया मध्ये पाणी साचून राहते आणि पाणी जमा असल्याने मार्ग बंद पडते आणि वस्ती विभाग व टेकडी विभाग चे येणे -जाने बंद पडतात दोन्ही बाजुच्या नागरिकांनी खुबच कठीनाचा सामना करावे लागतात.वस्ती विभागात शाळा, काॅलेज, कोर्ट,नदी,शमशानघाट, कोळसा खदान असे महत्वाचे ठिकाण असल्याने शहरवासीयांना गोल पुलिया तुन रोज येने जाने करावे लागतात या बाजुने पण सरकारी दवाखाना, पोलिस स्टेशन, नगर परिषद, रेल्वे स्टेशन, जीवन प्राधिकरण, असे महत्वाचे ठिकाण असल्याने या गोल पुलिया चे निराकरण करुन रेल्वे प्रशासन ने लवकरात लवकर गोल पुलिया मध्ये साचलेले पाणी चा योग्य मार्ग काढुन द्यावे असे भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. अन्यथा आंदोलन करावे लागणार.वेळेवरच उपाययोजना करावे काही दिवसा मध्ये पाऊस येणार तर थोड्या पाण्या मध्ये गोल पुलिया बंद होतो तर पावसाळ्यात काय होणार, रेल्वे प्रशासन व रेल्वे चे ठेकेदार यांनी लवकरात लवकर उपाय योजना करावी

CLICK TO SHARE