खो -खो उन्हाळी शिबिर खेमजई तथा इंग्लिश स्पोकन वर्गाचा समारोप

खेल

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

ग्रामिण भागात अशा शिबीरांचे आयोजन ही कौतुकाची बाब शिक्षणाधिकारी प्रा.चंद्रपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खेमजई तथा ग्रामस्थ खेमजई यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 3/ 5 /2024 ते 12 /5 /2024 पर्यंत खो-खो उन्हाळी शिबिर तथा स्पोकन इंग्लिश वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 110 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. शिबिरात खेमजई,साखरा, वरोरा,मोखाळा,नागरी,लोधीखेडा, सोनेगाव, वडगाव, तसेच कोरपना तालुक्यातील पिंपळगाव या नऊ गावचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिरात वर्ग 6 ते 12 पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते. हे शिबिर पूर्णतः निवासी होते.ग्रामिण भागात निवासी स्वरुपाचे दहा दिवसाचे खो -खो चे उन्हाळी शिबिर घेण्याचा हा जिल्ह्यातील पहीलाच प्रयोग होय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, कौशल्यपूर्ण खेळ खेळता यावा व आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता यावे यासाठी मौजा खेमजई येथे दहा दिवसांचे खो -खो उन्हाळी शिबिर तथा स्पोकन इग्लिश वर्ग आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन दिनांक 3 मे 2024 ला सकाळी दहा वाजता माननीय ज्ञानेश्वरजी चहारे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्या हस्ते व माननीय डॉ. अघडते साहेब पशुधन विकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. शिबिरात दहा दिवसात शिबिरार्थीना खो-खो चे कौशल्य व इंग्रजी विषयाची माहिती शिकण्यास मिळाले.शिबिराची सुरुवात सकाळी पाच वाजता व्हायची.सकाळचे सत्र 5:00 ते 10:30 पर्यंत चालायचे यामध्ये सूक्ष्म व्यायाम,, पाच किलोमीटर अंतर धावणे , खो-खो चे कौशल्य आणि खो-खो चा सराव चालायचा. सकाळी 10:30 ते दुपारी 2:00 विश्रांती असायची.दुपारी 2:00ते 5:30 पर्यंत श्री गोपाळ गुडधे सरांचा इंग्लिश स्पोकन वर्ग चालायचा. सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत परत रनिंग, व्यायाम व खो खो चे स्कील व सराववर्ग नियमितपणे चालायचा. दुपारच्या सत्रात दुपारी दोन ते पाच या सत्रात गो वीथ स्ट्रक्चर तर्फे इंग्रजी स्पोकन वर्गाचे आयोजन केले जात होते. सन्माननीय श्री गोपाळ गुडधे सर हे नियमितपणे दहा दिवस निवासी राहून वर्ग घेत होते. या अशा महत्वपूर्ण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिकण्यास मदत झालेल्या या शिबिराचा समारोप दिनांक 12 मे 2024 ला सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत खेमजईच्या सरपंच मा. सौ मनीषाताई चौधरी ह्या होत्या. कार्यक्रमाचे बक्षीस वितरक म्हणून मा. डॉक्टर अश्विनी सोनवणे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. चंद्रपूर हजर होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा . ज्ञानेश्वरजी चहारे गटशिक्षणाधिकारी पं.स.वरोरा , मा. नितीनजी मत्ते ,जिल्हा शिवसेनाप्रमुख चंद्रपूर, मा. चंद्रहासजी मोरे उपसरपंच ग्रामपंचायत खेमजई, मा. डॉक्टर गंपावर साहेब, मा. डॉ. अघडते साहेब पशुधन विकास अधिकारी श्रेणी एक खेमजई, मा.श्री नामदेवराव राऊत साहेब माजी शिक्षण विस्तार अधिकारी, मा. श्री सागर पाटील सर केंद्रप्रमुख शेगाव बु. मा.श्री पावडे सर दिशा एज्यूपाॅईंट वरोरा, मा. श्री रमेश बावणे माजी सरपंच खेमजई,मा. श्री रमेशजी चौधरी सदस्य ग्रा.पं. खेमजई ,मा.नथ्थूजी घरत तथा बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते. सन्मा. बक्षीस वितरक डॉ. अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ही ग्रामीण भागातील मुलगी होती आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये कौशल्य व अपार क्षमता लपलेल्या आहेत असे सांगितले. आपण सुद्धा भामरागड येथे कार्यरत असताना अशाच प्रकारचे 200 ते 300 मुलांचे शिबिर आयोजित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास भर घालण्याचा प्रयत्न केला. या कामी शासनाची सुद्धा मदत झाली असे सांगितले . कार्यक्रमात शिबिरातील बेस्ट बॉईज कॅडेट ऑफ समर कॅम्प 2024 कुमार दीक्षांत आडे व कुमार भृवेश ठाकरे याचा तर बेस्ट गर्ल कॅडेट ऑफ द समर कॅम्प 2024 कु .प्राची चौधरी व कु. अदिती काळे हीचा ट्राफी देऊन मा.डाॅ. अश्विनी सोनवाने शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)जि.प.चंदरपू यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.तर बेस्ट ऑफ द बेस्ट कॅडेट ऑफ द समर कॅम्प 2024 कुमार रुद्र नैताम ,नागरी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या शिबिरातील शिबिरार्थी कुमारी मोनिका तुळशीराम तुमसरे वर्ग आठवा हीने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा अहवाल वाचन या शिबिराचे संयोजक तथा शिबीर प्रमुख श्री संजू श्रावण जांभुळे सर यांनी केले. शिबिरात सतत दहा दिवस निवासी राहून श्री कुंभारे सर खो खो नॅशनल पंच,श्री स्वप्निल सायंकार राज्यस्तरीय ॲथलेटिक पंच ,कुमार बंटी घुगल कुमारी पूजा नेवारे ,कुमारी आयुषी मोहूर्ले ,कुमारी धनश्री ताजणे यांनी मार्गदर्शक तथा कोच म्हणून भूमिका पार पाडली. या शिबिराला सर्व प्रकारची मदत ग्रामस्थांनी केली. शिबिर निवासी असल्यामुळे त्यांच्या राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था खेमजई ग्रामवासियांनी केली .कार्यक्रमाचे आभार शिबिरार्थी कुमारी नियती चौधरी हीने केले.

CLICK TO SHARE