साखरा राजा इथे स्पोकन इंग्रजी वर्गाच्या ४० दिवसीय उन्हाळी शिबीराला सुरवात

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

गेल्या चार वर्षांपासून ग्रामिण भागातील जि. प. शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी गोपाळ गुडधे संचालित ” गो विथ स्ट्रकचर ” द्वारे आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबीराला आज दि. १४ मे २०२४ ला एका अत्यंत साध्या समारोहाने जि. प. शाळा साखरा राजा चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक पिरके यांच्या अध्यक्षतेखाली सुरवात करण्यात आली . यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश जोशी,उपसरपंच ग्रा. पं. साखरा सचिन जोशी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बालुभाऊ उमरे,आडेजी व प्रशांत घुगल आणि पालक वर्ग उपस्थित होते . दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या शिबीरासाठी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.यावर्षी शिबीरात ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे पं.स.वरोरा शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात हे शिबीर संपन्न होत आहे.मोखाळा,खेमजई,साखरा व लोधिखेडा या गावातील विद्यार्थी या शिबीरात सहभागी झालेले आहेत . दररोज शिबीराची सुरवात सकाळी ७-०० वाजता योगा,प्राणायाम व मेडीटेशन ने होऊन सकाळी ११-०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना इंग्रजी चे बेसिक शिकविण्यावर भर दिला जातो.या शिबीराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढावा व जि. प. च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ८ वी पासून सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्याची हिम्मत दाखवावी हा आहे.यावर्षी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील ३४४ विविध वाक्यरचना व इयत्ता ८ वी व ९ वी च्या ग्रामरवर भर दिल्या जाणार आहे असे शिबीराचे संचालक गोपाळ गुडधे सरांनी सांगितले आहे.या प्रसंगी शिबीरार्थी विद्यार्थी,पालक वर्ग , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व साखरा राजा येथिल गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

CLICK TO SHARE