इंदुरा शाळेचे घवघवीत यश

एज्युकेशन

प्रतिनिधी :अशोक इंगोले (हिंगोली)

हिंगोली: वसमत..नुकताच दहावीचा सीबीएससी बोर्डाचा निकाल घोषित झाला असून तालुक्यातील एकमेव सीबीएसई मान्यता प्राप्त शाळा इंदिरा इंग्लिश स्कूल (सी बी एस ई) अंजनगाव पूर्व वसमत शाळेने घवघवीत यश प्राप्त केले आहे शाळेचा विद्यार्थी बाबुराव सवणे यांनी 99% घेऊन जिल्हा प्रथम तर सार्थक पेटकर 98 टक्के घेऊन द्वितीय श्रेया टेंभुर्णे 97% घेऊन तृतीय आली आहे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून सोहळा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे तर 91 टक्के ते 99% गुण घेणारे 40 पैकी 32 विद्यार्थी आहे विविध विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 10 विद्यार्थी असून कोणत्याही महागड्या शिकवणी वर्गाशिवाय फक्त शाळेच्या मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे निकालात मुला मुलींनी समान बाजी मारली आहे निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सीबीएससी डिपार्टमेंट मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे वसमत तालुक्यातील एकमेव सीबीएससी बोर्डाची मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळेचा हा रेकॉर्ड ब्रेक निकाल असल्याचे दिसून येते इंदुरा शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शैक्षणिक विकास साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत सर्व अनुभवी शिक्षकवंद प्रचार्य विद्यार्थी आणि पालक वर्ग यांनी घेतलेल्या कठीण परिश्रमाचे हे फलित आहे असे संचालक कैलास पानखडे यांनी सांगितले येत्या काळात आणखीन यशाची नवनवीन शिखरे जिंकण्यासाठी इंदिरा सदैव तत्पर आणि तयार असल्याचे ते म्हणाले वसमत तालुक्यातील घराघरापर्यंत सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम पोहोचविणे गुणवंत विद्यार्थी घडविणे आणि येत्या काळात स्पर्धा परीक्षेची मोठ्या प्रमाणात तयारी करून घेण्याचे ध्येय शाळेने ठेवले आहे अतिशय तळागाळातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात कोणत्याही मेट्रो सिटी मध्ये न जाता गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळवून देणे हेच इंदुरा शाळेचे पुढील ध्येय असेल असेही त्यांनी सांगितले सर्व यशस्वी विद्यार्थी पालक शिक्षक व प्राचार्य यांचे वसमत परिसरात कौतुक केले जात आहे पालकांनी शाळेचे यश पाहून समाधान व्यक्त केले आहे सर्व यशस्वी विद्यार्थी यांना पुढील भविष्यासाठी शालेय प्रशासनाने शुभेच्छा दिल्या आहेत

CLICK TO SHARE