बल्लारशाह रेल्वे स्थानकावर लिफ्ट सेवा सुरू,झेड.आर.यू.सी.सी.सदस्य अजय दुबे यांच्या प्रयत्नांना यश

सोशल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर :झेड.आर.यू.सी.सी. सदस्य सेंट्रल रेल्वे झोन मुंबई अजय दुबे यांच्या अथक परिश्रमातून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २,३,४,५ वरील लिफ्ट प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे. तर प्लॅटफॉर्म क्र. १ ची लिफ्ट या महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.याबाबत दुबे यांनी डी. आर. एम. कार्यालय नागपूर यांचेशी संपर्क साधून काही महिन्यांपूर्वी लिफ्ट सुरू करण्यात येणार होती, मात्र तांत्रिक अडथळ्यांमुळे सुरू झाले नाही. १७ जानेवारीला लिफ्टच्या कामाचा आढावाही घेण्यात आला होता.यावेळी स्टेशन अधीक्षक रविंद्र नंदनवार, लिफ्ट इंजिनीअर योगेश बाविस्कर, मिथिलेश पांडे, निखिल घुगलोत, विजेंद्र परमार, पप्पू सोनी उपस्थित होते.

CLICK TO SHARE