बामणी प्रोटीन,सनप्लॅग स्टील अँन्ड मेटल उद्योग बंद पडल्याने शेकडो कामगारांवर उपासमार

बिज़नेस

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्हात प्रदुषणाचा नावाखाली दोन प्रसिद्ध उद्योग बंद पडल्यामुळे हजारो लोकावर उपासमारीची पाळी आली आहे.बल्लारपुर तालुक्यातील बामणी गावाजवळ असलेल्या बामणी प्रोटीन लिमिटेड कारखान्याला तसेच भद्रावती तालुक्यातील बेलगाव सनप्लॅग स्टील अँन्ड मेटल कंपनीवर पर्यावरणबंदी राजेश बेले यांच्या तक्रारीवरून उद्योग बंद करण्याची पाळी आली बामणी प्रोटीन लिमिटेड येथील१८ मे ला ताले ठोकण्यात आले असून कामगारांना १९ मे पासून न येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.यावळी त्यांचे पगार व इतर देय रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करून देण्यात येणार आहे.कंपनीच्या या निर्णयामुळे शेकडो कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.कंपनीच्या वतीने नोटीस जारी करुन, सर्व कामगार आणि अनौपचारिक मजुरांना २१ जुलै २०२४ पर्यंत त्यांचे पगार, इतर भरपाई आणि थकबाकीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वेळेवर जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले.१८ मे पासून कारखाना बंद करण्यात आले.त्यामुळे सर्व कामगारांनी १९ मे पासून ड्युटीवर हजेरी लावली नाही. त्यानंतर एजीएम (पीआरए), सीएल, बीपीएलच्या परवानगी शिवाय कोणत्याही कामगाराला कारखान्यात प्रवेश करता येणार नाही. जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांच्या तक्रारीवरून एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भगले यांनी १३ मार्च ला बामणी प्रोटीन्स प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या संदर्भात बामणी प्रोटीन्स प्रा. लि. एचआर विभागाचे सतीश मिश्रा म्हणाले की, बामणी प्रोटीन लिमिटेड कारखाना आजपासून कायमचा बंद आहे.

CLICK TO SHARE