1 लक्ष रुपयांची लाच मांगणाऱ्या वनरक्षकाला 1500 रुपयाची लाच घेताना अटक

क्राइम

जामगाव येथे पैसे घेताना झाली अटक,वडविहरा बीटला होता वनरक्षक

मच्छिंद्र वासुदेव मोहोटे असे अटक करण्यात आलेल्या वन रक्षकाचे नाव,लाच लुचपत विभागाचे केली अटक

योगिराज कृष्णाजी सातमोहनकर असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (त. 20) नरखेड तालुक्यातील वडविहरा बीटला वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मच्छिंद्र वासुदेव मोहोटे वय वर्ष 47 याला 1500 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. मच्छिंद्र वासुदेव मोहोटे यांनी टी पी पंचनामा करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागितली होती.सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास 1500 रुपयांची लाच घेताना वनरक्षक मोहोटे याला लाच लुचपत विभाने जामगाव येथून अटक केली आहे.योगिराज कृष्णाजी सातमोहनकर रा.जामगाव असे तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून जामगाव येथे त्यांचे फर्निचरचे दुकान आहे. त्यांना नेहमी टीपी काढण्यासाठी वन विभागाशी काम असायचे. योगिराज कृष्णाजी सातमोहनकर याना वनरक्षक मच्छिंद्र मोहोटे यांनी एक लक्ष रुपयांची मागणी केली होती त्यापैकी 25 हजार रुपये अगोदरच दिले होते राहलेले 75 हजार रुपयासाठी मोहोटे नेहमी घरी येऊन तकादा लावला होता.तसेच कॉल करून कार्यवाही करण्याची धमकी देत होते.तसेच वारंवार रात्रीच्या वेळेस 12 वाजता येऊन त्रास देत होता.त्याच्या या जाचाला कंटाळून सात मोहनकर यांनी लाच लुचपत विभाग नागपूर येथे तक्रार केली. केलेल्या तक्रारीवरून लाच लुचपत विभागाने सापळा रचत सोमवारी सायंकाळी 6 वाजता वन रक्षक मोहोटे याला लाच घेताना अटक केली.लाच लुचपत कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीसाठी वन रक्षक मच्छिंद्र मोहोटे याला नागपूर येथे नेण्यात आले आहे.

CLICK TO SHARE