तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
बारावीनंतर आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना शाळा सोडावी लागते. काहींना पुढील उच्च शिक्षणाचा खर्च झेपत नसल्यामुळे अनेक पालक बारावीनंतरच मुलींचं लग्न लाऊन देतात. मात्र आता यावर महाराष्ट्र सरकारने मार्ग शोधलाय. त्यानुसार, अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह उच्च शिक्षणातील तब्बल 642 कोर्सेसचा खर्च शासन उचलणार आहे. म्हणजेच मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सूरू होणार आहे. त्यामुळे मुलींनो आता खचून जाऊ नका, धीर सोडू नका. भरपूर शिका. संधीचा फायदा घ्या.