पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो पय्या बोधी आणि भिक्खू संघ यांच्या वतीने विधिवंत पूजा पाठ करून बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना
प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली
वसमत येथे बुध्द मूर्ती ची प्रतिष्ठापना .वसमत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बुध्द मूर्ती ची प्रतिष्ठापना पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आली. पुज्य भदंत पय्या बोधी आणि भिक्खू संघ यांच्या वतीने विधिवत पूजा पाठ करून मूर्ती स्थापित केली.यावेळी भंते डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी धम्म देसणा दिली यावेळी बोलतांना त्यांनी बुध्द विचार प्रत्यकाने अंगी कारणे गरजेचे असून शभर बुध्द विहार जे कार्य करतात ते कार्य एक भंते जी करतात , वसमत येथील बुध्द विहार हे अत्यंत सुंदर झाले असून लवकरच एक मोठे धार्मिक स्थळ म्हणून नावारूपास येईल असे ते म्हणाले.पुज्य भदंत पय्या बोधी यांनीही अभ्यासपूर्ण प्रवचनात बुध्द धम्म तत्व मानवी जीवनात आत्मसात करणे काळाची गरज असून प्रत्येक बुध्द अनुयायांनी त्याचे अनुसरण करावे.असे प्रतिपादन त्यांनी केले.बुध्द मूर्ती ची भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली मोठ्या संख्येने धम्म उपासक आणि उपसिका शुभ्र वस्त्र परिधान करून सहभगी झाले होते.सदरील मूर्ती उपासक यशवंत उबारे यांनी दान दिली तर ऍड रणधीर तेलगोटे, डॉ.चंद्रकांत गायकवाड,राजकुमार यगडे, प्रा .सुभाष मस्के,गौतम पारखे यांनीही कार्यक्रम आणि बुध्द मूर्ती बांधकाम साठी दान दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयकुमार एंगडे,एस.पी मुळे, केरबा दातार, केशव कुंट वाड,लिंबाजी कांबळे, आकाश दातार, सोनी उबरे,सुरेश दवणे, पी सी कांबळे, भास्कर गवळी, भाऊ मुळे,राजा भाऊ ऊबारे,सुभाष कदम, यांच्या सह अनेक मान्यवर उपसकानी परिश्रम घेतले.सदरील कार्यक्रमास आमदार राजू भैया नव घरे,यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष मस्के यांनी केले तर आभार यशवंतराव उबारे यांनी मानले .