शेतकऱ्यांची मुलगी जिल्ह्यातून प्रथम,प्राजक्ता प्रकाश नाडेकर असे तिचे नाव

एज्युकेशन

12 वी मध्ये मिळाले 97.83 टक्के गुण.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (त.24) रात्रंन दिवस परिश्रम घेत तिने यशाला गवसणी घातली. प्राजक्ता प्रकाश नाडेकर या मुलीने वर्ग 12 वी मध्ये नबीरा महाविद्यालय काटोल येथून कॉमर्स (इंग्रजी) शाखेतून 97.83 टक्के गुण प्राप्त करत नागपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावलं आहे. प्राजक्ताने वर्ग 1 ली ते वर्ग 7 वी चे शिक्षण गुरुकुल कॉन्व्हेन्ट तर वर्ग 8 वी ते 10 वी चे शिक्षण एस. आर. के. इंडो पब्लिक जलालखेडा येथून पूर्ण केले.वर्ग 10 मध्ये 93.80 टक्के गुण घेत तालुक्यातून तृतीय येण्याचा मान पटकावला होता. 11 व 12 वी च्या शिक्षणासाठी ती काटोल येथे गेली. काटोल येथील नाबिर महाविद्यालय तिने प्रवेश घेतला. जिवाचं रान करत तींन्हे रात्रंन दिवस अभ्यास केला. प्राजक्ताचे वडील शेती करतात तर आई गृहिणी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने असतात. पण प्राजक्ताने त्यावर मात करत यशाला गवसणी घातली. त्यात तिच्या आई वडिलांची चांगली साथ मिळाली. त्यांनी तिला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. परिस्थिती बिकट असताना तिला त्या गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही. दहावीच्या परीक्षे नंतर तिने बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. प्राजक्ता पहाटे उठून व नियमित अभ्यास करायची. वर्षभर नियमित अभ्यास करून तिने परीक्षेचा सराव करून घेतला. बारावीतील यशानंतर प्राजक्ताला सीए व्हायचे आहे. या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला तिच्या शाळेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्राजक्ताचे कौतूक केले. जलालखेडा येथे तिचे गावाच्या वतीने पुष्गुच्छ व ग्राम पंचायत सदस्य कीर्ती पेठे यांनी एक वर्षाचे त्यांना मिळालेले मानधन प्राजक्ताला l यावेळी देऊन अभिनंदन केले. यावेळी सरपंच कैलास नीकोसे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष अतुल पेठे, मनोज खुटाटे, विनोद घोरमाडे, प्रताप वानखेडे यावेळी उपस्थित होते. तसेच एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा या शाळेच्या वतीने संचालक कुलदीप हीवरकर, प्राचार्य शुभांगी अर्डक व शाळेतील शिक्षकाणी प्राजक्ताच्या घरी जाऊन तिला पुष्गुच्छ देऊन अभिनंदन केले. फोटो ओळी. प्राजक्ताचे अभिनंदन करताना मान्यवर. बॉक्स, मी सतत कॉलेज जायची, मी कधीही कॉलेजला सुट्टी मारली नाही. नियमीत अभ्यास करायची. यश मिळवण्यासाठी एकाग्र राहणे गरजेचे आहे. आपले ध्येय नीच्छित करून त्या वाटेवर चाललो तर यश नीच्छित मिळते. मला सीए व्हायचे आहे. हे मी आधीच ठरवले होते व त्यानुसार मी वाटचाल केली. माझ्या यशाचे श्रेय माझे आई वडील, प्राचार्य व शिक्षकांना देते. प्राजक्ता नाडेकर 12 वी मध्ये कॉमर्स शाखेतून जिल्ह्यातून प्रथम आलेली मुलगी.

CLICK TO SHARE