राजेंद्र ईखार,मयुरी देशमुख(पादाडे) यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

सोशल

प्रतिनिधी:निखिल ठाकरे हिंगणघाट

महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP कडून दरवर्षी राज्य स्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो.यावर्षी गुरुदक्षिणा ऑडिटोरियम हॉल,कॉलेज रोड नाशिक येथे राज्य स्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित केलेला होता. वर्धेमधून राजेंद्र ईखार,मयुरी देशमुख (पादाडे) सोबतच विश्वजित शेंदूर्षे, हेमराज रमदम,रजनिश फुलझेले यांना हा आदर्श शिक्षक पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाला आहे. कारंजा (घा) पंचायत समिती मधून शिक्षकी सेवेची सुरुवात करणारे राजेंद्र रामदासजी ईखार हे शिक्षकी पेशा सांभाळतानाच त्यांनी पंधरा वर्ष शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव म्हणून काम केले.वर्धा जि.प.एम्प्लॉइज अर्बन को ऑप.बँकेचे बारा वर्ष संचालक म्हणून,तर पाच वर्ष पूर्णवेळ बँकेचे अध्यक्षपद भूषवून बँकेचा नावलौकिक वाढविला.आणि सद्या ते अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्षपदी असून सेवासमाप्तीच्या उंबरठयावर असतांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल ने सरांच्या या त्यांचा कार्याची दखल घेवून राज्य स्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार बहाल केला. त्याचबरोबर जि.प.प्राथमिक शाळा सुलतानपूर पं.स. हिंगणघाट जि.वर्धा येथे कार्यरत असणाऱ्या कु. मयुरी देशमुख (पादाडे) यांना शिक्षक फाऊंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र शिक्षक पॅनल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान सोहळा २०२४ करिता आदर्श शिक्षक म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे व सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. कु. मयुरी देशमुख ह्या उपक्रमशील,तंत्रस्नेही,विद्यार्थी प्रिय, विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी तत्पर असणाऱ्या शिक्षिका असून त्यांचे १०० % विद्यार्थी प्रगत आहेत. त्यांनी MOOC अंतर्गत गोल्ड बॅंड प्राप्त झाले आहे.विद्यार्थ्याच्या प्रगती करिता असलेल्या विविध उपक्रमांमुळे शाळेला जिल्हांतर्गत व बाहेर जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी शाळेला प्रेरणा भेट दिली आहे .कीड्स फाऊंडेशन प्रस्तून नवोदय बुस्टर या यूट्यूब चॅनल द्वारे बुद्धिमत्ता चाचणीचे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यासाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन करतात . त्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १००% असतात.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा अंतर्गत शाळेला तालुकास्तरीय तृतीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अध्ययन अध्यापनाचे व्यवस्थापन व मुल्यमापन या प्रशिक्षणास राज्यस्तरीय सुुलभक म्हणून कार्य पार पाडले असून निपूण भारत अभियान अंतर्गत निपूण कृतींचे सादरीकरण स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.उपक्रमशील शिक्षिका मयुरी देशमुख यांचे विद्यार्थीही विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करीत आहेत. सोबतच वर्धेतून विश्वजित शेंदूर्षे, हेमराज रमदम,रजनिश फुलझेले यांना हा आदर्श शिक्षक पुरस्काराचा बहुमान प्राप्त झाल्याबद्दल MSP चे अध्यक्ष दिपक चामे सर लातूर,सतिश कोळी सर खुलताबाद,गिरीश दारुंटे सर मनमाड,वर्धा MSP टीमचे वसंतराव खोडे,डॉ.द्यानेश्वर वाघमारे,सचिन येवले,रामराव मेहत्री,रंजना धवणे,सिमा पांढारकर,केंद्रप्रमुख सुरपाम,विठ्ठल तपासे,यशवंत आटे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे मधुकर चाफले,प्रदीप ताटेवार,मुकुंद भलमे,छ्त्रपती फाटे,निवृत्ती शेळके,संजय नंदनवार,संजय पादाडे,प्रशांत गिरडकर,मनोज बोधाणे,वासुदेव तडस,जयंत आखतकर,संजय येवले,मंगेश डफ,मनोज राखुंडे,विजय चांभारे, गजानन सोनवणे,मनोज मुंगले,माधव काकडे,प्रमोद बोरकर,रमेश कामडी, शरद ढगे,राजू नंनोरे,छ्त्रपती रोकडे,प्रफुल घोडे,विनोद निमजे,नरेंद्र ननावरे मायाताई चाफले,शुभांगिणी वासनिक,वैशाली लांजेवार,माधुरी विहिरकर,अनिता गुंडे,तृप्ती कळवतकर,हर्षा बोरकर,रंजना गभणे इत्यादींनी अभिनंदन केले.

CLICK TO SHARE