बामणी प्रोटीन्स उद्योगा समोर सुरु असलेल्या कामगारांच्या धरणे आंदोलनाला यंग चांदा ब्रिगेडने दिली भेट

सोशल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटिन्स उद्योग बंद करण्याचा निर्णय उद्योग व्यवस्थापनाने घेतल्याने येथील कामगार बेरोजगार झाले आहे. या विरोधात कामगारांनी बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली.यावेळी कामगारांच्या मागण्या समजून घेत उद्योग व्यवस्थापनाने उद्योग बंद न करता प्रदूषण नियमक मंडळाच्या आदेशाचे पालन करावे आणि उद्योग सुरु करावे असे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने म्हणण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, आशा देशमुख, निलिमा वनकर, अस्मिता डोणारकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.बामणी प्रोटीन्स उद्योगातून दुषीत पाणी भगर्थी नाल्याच्या माध्यमातून वर्धा नदीत सोडल्या जात होते. या दुषित पाण्यामुळे आरोग्यावर गंभिर परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी शुध्द करावे मग ते नाल्यात सोडावे असे आदेश प्रदूषण नियमक मंडळाने कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. यासाठी पूरेसा वेळही उद्योग व्यवस्थापनाला देण्यात आला होता. मात्र व्यवस्थापनाने सरळ उद्योगच बंद केला. परिणामी येथे काम करणारे २२३ कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे या कामगारांसमोर परिवाराच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी आता धरणे आंदोलन सुरु केले आहे.दरम्यान यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सदर आंदोलनाला भेट दिली आहे. उद्योग व्यवस्थापनाचे प्रदूषण नियमक मंडळाने दिलेले आदेश पाळावेत यासाठी उद्योगाला पूरेसा वेळही देण्यात आला आहे. नियम न पाळता उद्योग बंद करणे हा कामगारांवर अन्याय आहे. असे यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर यांनी म्हटले आहे.

CLICK TO SHARE