बल्लारपूर गोल पुलिया च्या बांधकामासाठी रेल्वे आणि राज्य प्रशासनाची संयुक्त बैठक होणार-पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

सोशल

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : ना. सुधीर मुनगंटीवार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र शासन व पालकमंत्री यांच्याशी प्रदेश भाजपा कामगार मोर्चा उपाध्यक्ष व झेडआरयूसीसी सदस्य मध्य रेल्वे मुंबई उपाध्यक्ष अजय दुबे यांनी आज भेट घेऊन अनेक महत्वाच्या विषयांवर निवेदने सादर केली.त्यामध्ये बल्लारशाह रेल्वे लाईन गोल पुलियावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचे बांधकाम, दुसऱ्या अंडर पासचे बांधकाम, गोल पुलिया येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन स्थलांतरित करणे, बल्लारशाह रेल्वे स्थानकातील पाणी व सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आदींचा समावेश आहे. नवीन रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वे आणि राज्य प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत सर्व मुद्द्यांवर तत्वत: सहमती दर्शवली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

CLICK TO SHARE