संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची टीम महाराष्ट्र प्रमोशन दौऱ्यावर

मनोरंजन

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली

वसमत येथे आज रोजी मा.मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेल्या 21 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटाची टीम महाराष्ट्र राज्याच्या प्रोमोशन दौऱ्यावर आसुण आज सायंकाळी 4 वाजता वसमत शहरातील विविध ठिकाणी संवाद साधला .त्यावेळी सर्व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*संघर्ष योद्धा चित्रपटाचे नायक रोहन पाटील व डायरेक्टर गोवर्धन दोलतोडे हे वसमत येथे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता त्यांनी मदन भोसले यांच्या कन्हैया बोरवेल या ठिकाणी तसेच बोखारे यांच्या महाराष्ट्र ॲग्रो एजन्सी येथे भेट दिली असता मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले नंतर पत्रकार परिषद सुद्धा छान झाली पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे हसत खेळत देऊन चित्रपट 21 जून रोजी पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असल्याची माहिती दिली.*वसमत तसेच हिंगोलीकरानी चित्रपटाला भरभरून प्रसिद्धी द्यावी असे आवाहन रोहन पाटील व डायरेक्टर दोलतोडे यांनी केले याप्रसंगी प्रा नामदेव दळवी मा.नगरसेवक राजेश पवार, रियाजशेठ,गंगाधर हरणे सर, दीपक कदम सर मदन भोसले, प्रसाद बोखारे ,वसंत जाधव, किशनराव कदम.. व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेते रोहन पाटील यांना भेटण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी वसमतकरांनी खूप गर्दी केली होती.

CLICK TO SHARE