बंगाली कॅम्प येथे मनपाची मोठी कारवाई,बल्लारशाह रोड येथील अतिक्रमण हटविले

सोशल

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर २७ मे – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकची कारवाई सुरूच असुन रविवार २६ मे रोजी बंगाली कॅम्प, मूल रोड, बल्लारशाह रोड येथील अतिक्रमण येथील फूटपाथ नालीवरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण शहर पोलीस स्टेशन व वाहतूक पोलिस विभागाशी समन्वय साधुन काढण्यात आले आहे.शहरातील विविध भागात मनपाद्वारे अतिक्रमण निर्मुलन मोहीम मागील काही दिवसांपासुन सातत्याने सुरु असुन शहरातील अनेक भागातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात काढुन रस्ते मोकळे करण्यात आले आहे. फुटपाथवर केलेली पक्की बांधकामे, दुकानांसमोरील बांधकाम केलेले रॅम्प, कच्चे व पक्के शेड तोडुन फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे.कालच्या कारवाईत रस्त्यावर अनधिकृतरीत्या आलेल्या दुकानदारांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले. मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे ऑटोद्वारे सातत्याने देण्यात येत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, कारवाईची तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा, पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. तसेच फुटपाथ व सार्वजनिक रस्त्यांवर पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक, पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.

CLICK TO SHARE