रुग्णसेवक सूरज कुबडे यांची प्रहारच्या जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती

सोशल

प्रतिनिधी:निखिल ठाकरे हिंगणघाट

येथील प्रहारचे धडाडीचे कार्यकर्ते रुग्णसेवक श्री सूरज दादाजी कुबडे यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याचे प्रहारचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी दि 26 जूनला दिलेल्या पत्रातून कळविले आहे. श्री सूरज दादाजी कुबडे हे मागील पाच वर्षा पासून प्रहारचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या भागात परिचित आहेत. जनसामान्यांच्या विविध प्रश्ना साठी ते सतत आक्रमक असतात. रुग्णसेवक म्हणूनही त्यांच्या कामाचा मोठा आवाका आहे. जनतेला उत्तम दर्जाची व तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ते सतत कार्यमग्न राहत असतात. येथील प्रहारचे जेष्ठ नेते रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून जनतेला न्याय मिळवून देतं असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गजू कुबडे यांनी पक्ष नेतृत्वा कडे जिल्हा प्रमुख पदासाठी त्यांची शिफारस प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बचू कडू यांच्या कडे केली होती.श्री कडू यांच्या आदेशानुसार सूरज कुबडे यांची प्रहारचे वर्धा जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.श्री सूरज कुबडे यांच्या नियुक्ती चे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

CLICK TO SHARE