जलालखेडा पोलीसांची अवैध वाळू माफिया विरुध्द धडाकेबाज कार्यवाही

सोशल

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा:दिनांक २७/०५/२०२४ रोजी रात्री २१/०० वा. दरम्याण पो स्टे. हहीत अवैध्य वाळु वाहतुकीवर आळा घालण्या करीता मा. सी.बी.चौहान ठाणेदार जलालखेडा यांचे पथक PSI/ शेंडे, PSI/ रामटेके, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम काकडे, निलेश खरडे, फिरोज शेख, जाकीर शेख, आशिष हिरुळकर,दिनेश जोगेकर, शिवदास सौंदळे,किशोर कांडेलकर, व चालक रविंद्र मोहोड सह पेट्रोलिंग करीत असतांना विश्वसनिय गोपनिय मुखवियद्वारे माहीती मिळाली कि, ग्राम- भिष्णूर परिसरामध्ये जाम नदी पात्रामधून १) किशोर व्यंकटराव बरडे वय ५७ वर्ष रा. भिष्णूर २) कैलास शेषराव कळंबे वय ३४ वर्ष रा. भिण्णूर हे व्यक्ति अवैधरित्या वाळु वाहतुक करित आहे अशा माहीती वरून स्टाफसह जाम नदीपात्रात लपत छपत्त जावून पाळत ठेवली असता, जाम नदी पात्रातून भिष्णूर रोडवर २२ ट्रॅक्टर येतांनादिसले स्टाफच्या मदतीने सदरचे ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरमध्ये पाहणी केली असता रेती आढळून आली रॉयल्टी बाबतविचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगीतले वरूण सदरचे दोन्ही ट्रॅक्टर क्रमांक १) MH 40 A-1646 व ट्रॉली MH 40 A/2711 मध्ये अंदाजे ०१ बास वाळू/रेती किंमत ५०००/- रू व स्वराज कंपणीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह किंमत ५,००,०००/- रु. २) MH 40 TCD-01 व ट्रॉली MH 40 CQ-6579 मध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू/रेती किंमत २,५००/-रू. व जॉन्डीयर कंपणीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह किमती ६,००,०००/- रू. असा एकूण ११,०७,५००/- रू चा.माल आरोपीचे ताब्यातून जप्त करूण ठाणेदार सा. यांचे आदेशाने पो. स्टेला. गुरनं. २५१/२०२४ कलम ३७९ भादेवी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधि सहकलम ४. २१ खाण आणि खणिज अधि.सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि.अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपी पोस्टेला अटक करण्यात आले आहे.तसेच पेट्रोलिंग करीत असताना विश्वसनिय गोपनिय मुखबिराद्वारे माहीती मिळाली कि, अवलीया बाबा दर्गा मसली फाटा भिष्णूर जवळ एक आकाशी रंगाचे वाळु/रेतीने भरलेला ट्रक येत आहे अशा माहीती वरून सदर ठीकाणी स्टाफसह गेले व स्टाफच्या मदतीने सदरचा ट्रक थांबवीला असता, सदर ट्रकचा क्रमाक MH 40 BG-5524 सदर ट्रक मध्ये पाहणी केली असता वाळू मिळून आली चालक नामे- किशोर सिताराम कुंभरे वय ३५ वर्ष रा. डोंगरगाव वास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगीतले सदर ट्रक मध्ये अंदाजे ०५ ब्रास वाळु/रेती किंमत २१५,०००/- रू. व टाटा कंपणीचा टिप्पर ट्रक किंमत २०,००,०००/- रू. असा एकूण २०,२५,०००/- रू. था. माल आरोपीचे ताब्यातून जप्त करूण ट्रक मालक मगेश मारोतराव देव्हारे वय ३८ वर्ष रा.झिल्पा ता. काटोल यांचे मालकीचा असून, सदर ट्रकचा चालक नामे किशोर सिताराम कुंभरे वय ३५ वर्ष रा. डोंगरगाव व मालक मंगेश मारोतराव देव्हारे वय ३८ वर्ष रा.झिल्या ता. काटोल यांचे विरुद्ध ठाणेदार सा.वांचे आदेशाने पो स्टेला. गु.र.नं. २५२/२४ कलम ३७९, १०९ भादवी सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधि. सहकलम ४, २१ खाण आणि खणिज अभिध, सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि.अन्वये गुन्हा नोंद करूनगुन्ह्यातील आरोपी पोस्टेला अटक करण्यात आले आहे. सदरचे दोन्ही गुन्ह्यांमध्ये असा एकुण ३९.३२,५००/- रू. चा माल जप्त करण्यात आलासदरची कार्यवाही ही मा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए.पोद्दार (भापोसे), मा.अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, मा.यापू रोहोम उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल यांचे मार्गदर्शनाखाली जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि सी.बी.चौहान, PSI/ शेंडे, PSI/ रामटेके, पोलीस अंमलदार पुरूषोत्तम काकडे, निलेश खरडे, फिरोज शेख,जाकीर शेख,आशिष शिरूळकर, दिनेश जोगेकर, शिवदास सौदळे, किशोर कांडेलकर, व चालक रविंद्र मोहोड यांचे मदतीने करण्यात आलेली आहे.गुन्हयांचा तपास ठाणेदार सपोनि सी.बी.चौहान यांचे मार्गदशर्नात पोहवा पुरूषोत्तम काकडे व पोना दिनेश जोगेकर है करित आहे

CLICK TO SHARE