जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर शहरात तसेच ग्रामीण भागात रेती भेटत नसल्यामुळे बांधकाम ठप्प झाले असून त्यांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य घनश्याम मुलचंदानी यांच्या नेतृत्वात काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना निवेदन तहसीलदार मार्फत दिले.बल्लारपूर शहरात तसेच ग्रामीण भागात रेती घाट लिलाव नाही होत असल्यामुळे रेती भेटत नाही आहे. त्यामुळे नागरिकांचे मंजूर घरकुलाचे काम होत नाही आहे. तसेच सर्व बांधकामे बंद पडली आहे. रेती तस्कर अवैध वाळू उपसाकरून आणत आहे. ज्या नागरिकांना रेतीची गरज आहे. त्याचा कडुन अधिक पैशाची लुट सुरू आहे. रेतीचा अभावी सर्व बांधकाम ठप्प पडून गेली आहे. शासनाच्या महसूल विभागाचे मंत्री रेती डेपो सुरु करण्याचा धोरण सुरु करण्याचा रेती हमीभाव सुरु केलेली ती योजना पण ठप्प पडलेली दिसुन येत आहे. नवीन रेती लिलाव करून तसेच पावसाळा जवळ येत असल्यामुळे पाणी येणार आहे. ही बाब लक्षात घेता याबाबत लोकहिताच्या निर्णय घेऊन रेती घाट सुरु करण्याची मागणी केली आहे.या वेळी निवेदन देताना गोविंदा उपरे तालुका ग्रामीण अध्यक्ष, देवेंद्र आर्य, भास्कर माकोडे, ऍड. मेघा भाले, अफसाना सय्यद, नरेश मुंदडा, डॉ सुनील कुलदीवार, इस्माईल ढाकवाला, रवि डेरकर, महमूद पठाण, ऍड आय आर सय्यद, सत्यशिला साळवे, रेखा रामटेके, सुरेश बोपनवार, सुनीता वाघमारे सह काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.