पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुरक्षा रक्षकाचा मूर्तदेह माती काढताना सापडला

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत सास्ती खुल्या खाणीत २४ मे पासून बेपत्ता असलेला सुरक्षा रक्षक आज मातीचा ढिगारा काढत असताना सापडल्याने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुरक्षा रक्षक सोहेल खानचा कामावर असताना मातीच्या ढिगाऱ्यात गाडून मृत्यू झाला की हत्या? या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.कामगारांत चर्चा होत आहे की मृतक सोहेल खान यांची सुरक्षा अधिकारी यांच्याशी वाद झाले होते. त्यांनी वचपा तर काढले नाही? त्या दिवशी मयत रजेवर असतानाही त्याचा बदला घेण्याकरीता त्याला बळजबरीने कामावर घेऊन गेल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

CLICK TO SHARE