तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव
येथील एका शेतकऱ्याच्या नावे खोट्या कागदपत्राच्या आधारे बोगस खाते बॅंकेत उघडून त्याची शेती विकण्याचा डाव रचणारे बँकेचे खातेदार व शेतीची विक्री करणारे दलाल यांचा डाव या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे उघड आला आहे.
सदर प्रकरणाची या शेतकऱ्याने पोलीस विभाग तथा बँकेच्या वरिष्ठांना तक्रार करूनही पाच महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा त्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही. बँकेच्या या बोगस खात्यामधून पाच लक्ष रुपयाची देवाण-घेवाण बँक कर्मचाऱ्यांच्या संगम मताने झाली असावी असा संशय या प्रकरणातील पीडित शेतकरी प्रल्हाद मनीराम कारंजेकर वय 62 वर्षे याने आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना व्यक्त केला.
शिव मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रल्हाद कारंजेकर यांनी सांगितले की कामठा रोडला गट क्र. 352 हे आर 2.02 आणि गट क्र.399 हे आर 0.26 त्यांच्या नावे शेती आहे. 22 नोव्हेंबर 2023 ला शेताकडे गेले असता कळले की काही दलाल व व्यापारी शेतावर येऊन गेले व शेतीची विक्री झाल्याची चर्चा कानावर आली.नंतर एका बँक कर्मचाऱ्यांकडून कळले की माझ्या नावे बँकेत बोगस खाते उघडण्यात आले आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता माझ्या नावे नकली आधार कार्ड व इलेक्ट्रिक बिल च्या वापर करून खाते उघडण्यात आल्याचे निदर्शनात आले. या खात्यातून पाच लक्ष रुपयाची देवाण-घेवाण झालेली आहे. जमिनीच्या खोटा सातबारा तयार करून दलालांनी शेतीची विक्री गोंदियातील एका व्यक्तीला केली व त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे या व्यवहारातून लक्षात आले. बँकेकडून छायांकित प्रत मागितले असता नकली आधार कार्ड,सातबारा व इतर कागदपत्रे खोटे असल्याचे आढळून आले. सदर प्रकरणाची बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला लिखित तक्रार दिली असता त्यांनी सदर व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी त्याला जबाबदार दोन बँक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत तर दिले मात्र काहीच कारवाई झालेली नाही.त्यावर काहीच कारवाई होत नसल्याचे लक्षात येतात 20 डिसेंबर 2023 ला पोलीस अधीक्षक गोंदिया येथे तक्रार नोंदवली व बोगस खात्याबद्दल कळविले. या प्रकरणाला पाच महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी बँकेत बोगस खाते उघडून खोटे सातबाराच्या आधारे जमिनीची विक्री करणाऱ्या या दलाला वर तसेच ओळखदार म्हणुन साक्षरी करणा-या वर गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी प्रल्हाद कारंजेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.