बल्लारपूर शहरात एक नदित डुबुन तर एक उष्माघाताने मूत्यू

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

दिनांक ०१/०६ /२०२४ बल्लारपूर : शहरात आज एक नदीत आत्महत्या एक डुबुन तर एक उष्माघाताने मूत्यू झाल्याची घटना घडली आहे .२८ मे ला धोपताडा ता.राजुरा येथील ३६ वर्षीय सतिश भुमया अडुरी याने सकाळी १० ते ११ वाजता च्या सुमारास सास्ती मार्गावरील वर्धा नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती.मागील चार दिवसांपासून स्थानिक गोताखराचा व बोट च्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते.आज १ जुन ला सकाळी त्याचे प्रेत मिळाले. पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविले तसेच काल ३१ मे ला ५६ वर्षीय दीपक गंगाधर चिटमलवार रा. श्रीराम वार्ड हे वर्धा नदी येथील गणपती घाट येथे आंघोळ करायला गेले असता पाय घसरुन खोल पाण्यात पडले त्यात त्यांचा अंत झाला. त्यांना दोन मुलं, पत्नी असून ते टू व्हीलर मेकॅनिकल चे काम करत होते. वरील दोन्ही घटनेचे तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमशाहा सोयाम, पोलीस शिपाही कैलाश आदे करीत आहेत.स्थानिक विद्यानगर येथे एका वृध्द महिला उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना काल ३१ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आले. पंचशील चौक विद्यानगर येथील गिरजाबाई प्रेमदास खैरे वय अंदाजे ७० वर्ष महिला ही आपल्या राहत्या घरी एकटीच राहत होती.
तीन दिवसांपूर्वी रात्री लाईट बंद झाल्यामुळे ती आपल्या अंगणात झोपली होती त्यात तिचा मृत्यू झाल्याचे अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ती मागील तीन दिवसापासून अंगणात खाटेवर मरून होती. काल सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दुर्गंधी पसरली होती त्यामुळे ही घटना उघडकीस आली. तिला दोन मुलं व एक मुलगी आहे. एक मुलगा होमगार्ड असून तो विसापूर येथे राहते तर दुसरा मुलगा करंजी जि. यवतमाळ येथे राहते.
पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक काँकेडवार करीत आहेत.

CLICK TO SHARE