खत बियाणे खरेदी करताना सावध रहावे,मंडळ कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

देश

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

खरीप हंगाम तोंडावरआला आहे. शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. रासायनिक खते, बी- बियाणे, कीटकनाशके यांची जुळवाजुळव शेतकरी करीत आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकऱ्याला सतर्क राहण्याची गरज आहे.कृषी केंद्रातून बी बियाणे, रासायनिक खते घेतल्यानंतर दुकानदाराच्या नावाचे बिल क्रमांक, उत्पादकाचे नाव, प्लॉट नंबर आणि किंमत हे सगळं बघूनच कृषी केंद्रातून माल खरेदी करावा. बियाणे पिकावर उगवण शक्ती भौतिक व अनुवंशिक शुद्धता टक्केवारी चाचणी व तारीख वैधता वर्ष व वजन तपासून घ्यावी, कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार दक्षता घेतल्यास फसवणुकीला आळा बसू शकतो.विक्रेत्याकडून बिल घ्यायलाच हवे, अधिकृत कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात. खरेदी केलेल्या निविष्ठांचा माल बिलाच्या पक्क्या पावत्या आवर्जून घ्याव्या आणि त्या एका हंगामापर्यंत जवळ जपून ठेवाव्या. सीलबंद वापराची मुदत पाहणे गरजेचे आहे. बियाणे वापरताना खालच्या बाजूने फोडावी त्यामुळेपिशवीचे लेबल व प्रमाण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहील व बियाण्यांची काढणी होईपर्यंत पेरणी केलेल्या लॉटचे थोडे बियाणे शिल्लक ठेवून एमआरपी एवढेच कृषी केंद्रामध्ये पैसे द्यावे. कृषी निविष्ठा खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्यास किंवा लक्षात आल्यास तालुका पातळीवरील तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी. कुठल्याही कृषी निविष्ठांची विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई करण्याचा प्रयत्न करू नये ज्या बियाण्यांची मागणी जास्त आहे, अशा सोबत इतर निविष्ठा लिंकिंग करू नये. अप्रामाणिक आणि प्रतिबंधित निविष्ठा शेतकऱ्यांना विक्री करू नये, निविष्ठा जादा दराने विक्री करण्यात येऊ नये, जादा पैशाची मागणी केल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी शुभ्रकांत सुखदेव भगत यांनी दिली आहे.

CLICK TO SHARE