बल्लारपूर येथे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजकिय व सामाजिक पदाधिकारी ची बैठक

चुनाव

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : चंद्रपूर लोकसभा निवडणुक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजकिय व सामाजिक पदाधिकारी ची बैठक पोलिस स्टेशन येथे घेण्यात आले. पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे आज ३ जुन रोजी बल्लारपूर शहरातील राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना शिंदे गट,शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,आम आदमी पार्टी, उलगुलान संघटना, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांची पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतमोजणी अनुषंगाने राजकीय पदाधिकारी , सामाजिक संघटना पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली .बैठकित मतमोजणीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार आहे व एका बाजूने निकाल लागणार आहे व उमेदवार निवडून येणार आहे. तरी कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी यांनी ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोक एकत्र जमा करू नये व पोलीस प्रशासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय विजयी उमेदवाराची रॅली काढण्यात येऊ, नये याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भोयर यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते चंदन सिंह चंदेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य घनश्याम मुलचंदानी, उलगुलान संघटनाचे अध्यक्ष राजु झोडे, शिवसेना (शिंदे गट) चे कमलेश शुक्ला, शिवसेना (उबाठा) गट चे सिक्की यादव, आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष रवि कुमार पुप्पलवार, वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष ओम रायपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे शहर अध्यक्ष बादल उराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा अध्यक्ष उमेश कुंडले, पंचशील तामगाडगे, शेख लाल सह विविध पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE