शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ च्या मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रुट मार्च काढले.पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे आज ३ जुन ला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कायदा व सुव्यवस्थेचा दुष्ठिकोनातुन रुट मार्च दंगा/काबु योजना अंबलवाणी करीता पोलिस स्टेशन बल्लारपूर ते गोल पुलिया,संत तुकडोजी महाराज चौक, गणपती वार्ड, बालाजी काॅमफ्लेक्स चौक, नविन बस स्थानक ते शहरातुन मुख्य महामार्गाने रेल्वे स्थानक चौक.जुना बस स्थानक चौक परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद चौक ते पोलिस स्टेशन बल्लारपूर पर्यंत रुट मार्च सकाळी १०:१५ वा. ते ११:३० वा. पर्यंत काढण्यात आले.सदर रुट मार्च करीता बल्लारपूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक आसिफराजा बी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ६ अधिकारी,३५ पोलिस अंमलदार हजार होते.