अपघातातील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू,रविवारी टाटा एस झाला होता पलटी

क्राइम

सागर मिलिंद शेंदरे असे मृत मुलाचे नाव.

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा (त.3) रविवारी सायंकाळी 5.45 च्या सुमारास नारसींगी येथे झालेल्या अपघातातील सागर मिलिंद शेंदरे वय वर्ष 22 रा. मुक्तापुर याचा सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुक्तापूर येथून काटोल येथे कॅटरिंग करिता मजुरांना घेऊन जाणारा टाटा एस क्रमांक MH-40- CM – 2562 गाडी नारसिंगी येथे रविवारी सायंकाळी 5.45 च्या सुमारास पलटी झाली गाडीत बसलेल्या 17 मजुरांन पैकी 9 मजुरांना दुखापत झाली असून त्यातील 6 मजुरांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचार सुरू होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सागर मिलिंद शेंदरे याचा उपचारा दरम्यान मृत्य झाला. तर अपघातातील यश शंकर वैद्य वय वर्ष 18, समिर मंगल इवणाते वय वर्ष 15, क्रिश दीपक हीवराळे वय वर्ष 15, प्रफुल जगदीश गिरडकर, वय वर्ष 18, निखिल किशोर हिवराळे वय वर्ष 15 यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. तर मयूर रामदास वाडबुदे वय वर्ष 17, आदित्य मिलिंद शेंदरे वय वर्ष 15, ओम जीवन खाडे वय वर्ष 13 याना किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. गाडी वेगाने असल्यामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे गाडीचा बलेन्स बिघडला व गाडी पलटी झाल्याचे रुग्णांनी सांगितले. वाहन चालक प्रवीण धार्मिक याला अटक करण्यात आली असून कलम 279, 337, 338 भादवि सह कलक 184, 108/177, 146/196, 130, 125 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार चेतनसिंग चौहाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे.

CLICK TO SHARE