पुलाच्या कठड्याला धडक दोन प्रवासी जखमी

क्राइम

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेरी गावाजवळील पुलाजवळ सकाळी ७ वाजताच्या सुमारास एसटी बस क्रमांक एम एच १३ सि. यू. ८२७८ चा चालक बबन साटोणे हिंगणघाट हे बस घेऊन जात असताना समोरील ट्रकला ओवरटेक करून जात असताना बस पुलाच्या कठड्याला धडकली यात दोन प्रवासी जखमी झाले तर बसचे मोठे नुकसान झाले या अपघातात कुठलीही जिवित हानी झाली नाही यासंबंधी पोलिस कर्मचारी राहुल नव्हाते यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आज पोलिसांकडून प्राप्त झाली असून या अपघाताचा पुढील तपास अल्लिपुर पोलीस करत आहे.

CLICK TO SHARE