नागरिकांनी वेळा ग्राम पंचायत ला ठोकले कुलूप

सोशल

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

देवळी पुलगाव मतदारसंघातील अल्लीपुर जवळील वेळा ग्रामपंचायत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. गेल्या आठ दिवसापासून या गावांमध्ये पाणी टंचाई चा सामना नागरी बांधवांना व महिलांना करावा लागत आहे. अशातच गावात असणाऱ्या हॅन्ड पंप सुध्दा बंद स्थितीमध्ये आहे ग्रामसेवक हेमंत शिरशीकर हे ग्रामपंचायत मध्ये नियमित येत नाही नेहमी ग्रामपंचायतला दांडी मारतात असा आरोप तेथील ग्रामस्थ बांधवांनी करीत तेथील नागरिक बंधू व महिलांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामपंचायतला कुलूप ठोकले गावामध्ये पाणी पुरवठा नियमित चालू करावा व बंद पडलेले हॅण्ड पंप सुरू करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

CLICK TO SHARE