शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व राजू दादा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा

सोशल

करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली :वसमत शिवराज्याभिषेक दिन व शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालयात संपन्न. शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा चापके यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे व त्यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून गुणगौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास डॉ. सुवर्णमालाताई शिंदे या अध्यक्षपदी उपस्थित होत्या. व मार्गदर्शक म्हणून श्री विठ्ठल कांगणे सर हे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमा च्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी व पालकांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी दहावी बारावीनंतर आपण काय करायचे कसे करिअर निवडायचे याबद्दल कांगणे सरांनी आपल्या विनोदी शैलीतून मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले विकासाकडून परिवर्तनाकडे जा आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीची जाणीव ठेवल्यास यशाचे शिखर गाठण्यापासून विद्यार्थ्यास कोणीच रोखू शकत नाही असे कागणे सर बोलत असताना म्हणाले शिवराज्याभिषेक दिन व शिवसेना तालुकाप्रमुख दादा चापके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळात कार्यकर्ते व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख राजू दादा चापके यांचे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनापासून आभार मानले.

CLICK TO SHARE