भारसिंगी व जलालखेडा येथील पुलाचे काम ४ वर्षांपासून रखडले.
जुन्या पुलावर वळणमार्ग असल्यामुळे होत आहे अपघात.
चार दिवसापूर्वी झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणांचा मृत्य.
प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर
जलालखेडा ( ता. ६) काटोल ते वरून या मार्गाचे सिमेंटी कारणांचे काम पूर्ण होऊन ४ वर्ष झाले असून सुद्धा अजून पर्यंत भारसिंगी व जलालखेडा येथील पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे काम सुरु असताना या दोन्ही पुलाच्या कामाला सुरवात झाली होत परंतु अजून पर्यंत ते पूर्ण झालेले नाही. दोन्ही पूल धोकादायक असल्यामुळे नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. तसेच भारसिंगी येथील जाम नदीवर असलेला जुन्या पुलावर मोठा वळण मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होतात. या वळण मार्गावर झालेल्या अपघातात कित्येक प्रवाशांना आपले जीव गमवावा लागला आहे. तसेच जुना पूल लहान असल्यामुळे पावसाळ्यात पुलावर पाणी वाहत असते त्यामुळे त्या मार्गावरील वाहातून तासोन तास बंद राहते. त्यामुळे वाहतूक दारणा याचा मोठा फटाका बसतो. तसेच या दोन्ही पुलाला पुष्कळ वर्ष झाले असून दोन्ही पूल जीर्ण झाले आहे. भारसिंगी येथील पुलवारी वळण मार्गावर ४ दिवसापूर्वी एक गाडी पलटी झाल्यामुळे अपघात झाला व अपघातात जखमी झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार कोण ? असा प्रश्न प्रवाशी विचार आहे. ४ वर्षांपासून पुलाचे काम पूर्ण होत नाही हि खरोखर लाजिरवाणी बाब असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाला नागरिकांच्या जीवाच काही घेणं देणं नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभाग होणाऱ्या अपघाताला जबाबदार असलयाचे बोलल्या जात आहे
पुलाच्या वळण मार्गाच्या बाजूला ठेवले सिमेंटचे भीम.भारसिंगी येथील नवीन पुलाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले असून जुन्या पुलाच्या वळण मार्गाच्या बाजूला नवीन पुलासाठी लागणारे सिमेंटचे भीम तयार करून ठेवण्यात आल्यामुळे पुलावरून येणारे वाहत दिसत नसल्यामुळे अपघात होत आहे. प्रत्येक महिन्यात या वळण मार्गावर अपघात होत असून प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. होणाऱ्या अपघातास संबंधित विभाग पूर्णपणे जबाबदार असून विभागाने त्वरित त्या पुलाचे काम पूर्ण करावे किंवा वळण मार्गाच्या कडेला ठेवलेले भीम उचलावे अशी मागणी होत आहे.
पुलाचे काम ४ ते ५ वर्षपूर्वी सुरु झाले होते. परंतु अजून पर्यंत ते पूर्ण झालेले नाही. पुलाचे काम रखडले असल्यामुळे जुन्या पुलावर वळण मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. तसेच पावसाळ्यात पूल लहान असलयामुळे पुलावरून पाणी वाहत असते त्यामुळे वाहतूक तासोंन तास बंद असते. त्यामुळे या बाबत संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन पुलाचे काम पूर्ण करावे.
कुलदीप हिवरकर माजी सदस्य ग्राम पंचायत जलालखेडा.