मोहम्मद नासिर चंद्रपुर जिला ब्यूरो चीफ
सर्वच क्षेत्रात महिलांनी समोर येऊन प्रभावीपणे काम करावे. हि धारणा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आहे. राजकारणात देखील महिलांनी सक्रिय होऊन काम करण्यासाठी त्या सातत्याने महिलांना आवाहन करीत असतात. चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात माजी शिक्षण मंत्री तथा आमदार वर्षाताई गायकवाड, आ. प्रतिभा धानोरकर तसेच महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.