रश्मी शुक्ला ठरल्या राज्याच्या पहिल्या महिला DGP

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. रश्मी शुक्ला आता राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. शुक्ला यांनी यापूर्वी राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. शुक्ला सध्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ यांच्याकडून राज्य पोलिसांची सूत्रे हाती घेणार आहेत. तसेच, रजनीश सेठ हे लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत.

CLICK TO SHARE