सुगंधित तंबाखूसह आरोपीला अटक

क्राइम

सुगंधित तंबाखूसह आरोपीला अटक

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

दुर्गापूर परिसरातील नेरी परिसरातील 15 डिसेंबरला रात्री उशिरा एका व्यक्तीला सुगंधित तंबाखूसह अवैधरित्या पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक यांना गुप्त माहिती मिळाली, नेरी वॉर्डातील मधुकर वाघमारे यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत एक अज्ञात व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत फ्लेवरयुक्त तंबाखू विक्रीच्या उद्देशाने उभा आहे. माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जेथे एक व्यक्ती हातात पांढरी पिशवी घेऊन उभा होता.

CLICK TO SHARE